"Re-Accredited with 'B++' Grade by NAAC"

महत्वपूर्ण सूचना

उन्हाळी - २०२१ च्या परीक्षा आवेदन पत्राबाबत नियमित व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता

 1. गोंडवाना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर https://gondwanauniv.emdoar.com/index.php विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या लॉगीनवर विद्यार्थ्यांनी लॉगीन करावे.
 2. लॉगीन करण्यासाठी लॉगीन आयडी तुमचा स्वत:चा PRN नंबर असेल तर पासवर्ड तुमच्या मार्कशीटवर असलेले आईचे नांव कॅपीटल अक्षरात असेल.
 3. स्वत:चे परीक्षा आवेदन पत्र डाउनलोड करावे व ते नीट तपासून घ्यावे त्यात नांव, विषय इत्यादी मध्ये चूक आढळल्यास महाविद्यालयीन कार्यालयात संपर्क साधावा.
 4. परीक्षा आवेदन पत्र अचूक असल्यास INWARD करावे. चूकीचे परीक्षा आवेदन पत्र INWARD करू नये तसे केल्यास तुमची हॉलटिकीट चूकीची येईल.
 5. विद्यार्थ्याने परीक्षा आवेदन पत्र INWARD केल्यावर तसेच परीक्षा शुल्क भरल्यावरच महाविद्यालयाच्या लॉगीन आयडीवर आलेले विद्यार्थ्याचे परीक्षा आवेदन पत्र विद्यापीठाच्या लॉगीन आयडीवर INWARD करण्यात येईल.
 6. विद्यार्थ्याने परीक्षा शुल्क न भरल्यास त्याचे परीक्षा आवेदन पत्र स्वीकारण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
 7. विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती आवेदन पत्र भरले नसल्यास महाव‍िद्यालयाचे पूर्ण शुल्क भरावे.

ऑनलाईन शुल्क भरण्याबाबत सूचना

 1. महाविद्यालयाने नियमीत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शुल्क भरण्याची व्यवस्था केली आहे.
 2. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी मात्र महाविद्यालयात येउनच शुल्क भरावे लागेल.
 3. ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर http://dacchanda.ac.in/ जाउन online Fees Payment या लिंकवर विद्यार्थ्यांनी लॉगीन करावे.
 4. लॉगीन करण्यासाठी Institute Type या बॉक्स मध्ये college नीवडा. महाविद्यालयात रजिस्टर केलेला मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी टाकून Send OTP वर क्लीक करा. तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडीवर OTP येईल ते टाकून Submit वर क्लीक करा.
 5. तुम्ही टाकलेला मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडीवर OTP न आल्यास तुम्ही टाकलेला मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी महाविद्यालयात रजिस्टर करण्यासाठी महाविद्यालयीन कार्यालयात संपर्क करा.
 6. तुमच्या मोबाईल किंवा ई-मेल आयडीवर रजिस्टर असलेल्या योग्य नावाची व वर्गाची नीवड करा.
 7. नीवड केलेल्या नावाची व वर्गाची लॉगीन ओपन होईल व भराव्या लागणाऱ्या शुल्काची यादी समोर येईल. जे शुल्क आपल्याला यावेळी भरावयाचे आहे त्याच्या Action या बॉक्स मधे क्लीक करून Pay Now या बटन वर क्लीक करा.
 8. आपला ऑनलाईन Payment करण्याचा पर्याय निवडा व दिलेल्या निर्देशाचे पालन करून Payment करा.

Online Exam Application Form Submission without Late Fee: 27-06-2021 upto 06.00 p.m.Online Fee Payment